(भाग-२)
'लमाण' मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत...एक म्हणजे लागूंचा तीन
खंडांचा परदेशप्रवास , दुसरी म्हणजे त्यांनी केलेली प्रायोगिक व व्यावसायिक
नाटके आणि तिसरी म्हणजे राजकारण आणि समाजकारण यात त्यांनी वठविलेली
भूमिका...हे तीनही भाग त्यांनी तपशिलात रंगविलेले आहेत आणि त्यामुळेच
'लमाण'चे मूल्य सिद्ध झालेले आहे...मुख्यत:
आपल्या डॉक्टरी व्यवसायामुळेच लागूंचे वास्तव्य कॅनडा , टांझानिया व लंडन
येथे झाले...कॅनडा व टांझानियामधले त्यांचे अनुभव अत्यंत मजेदार
आहेत...उदा. किलिमांजारो या पर्वताची चढाई...परंतु डॉक्टरांना लागलेला
नाटकांचा ध्यास सतत त्यांच्यापाशी राहिला...स्ट्रॅटफर्ड- ऑन्टारियो आणि
न्यूयॉर्क- लंडन येथे त्यांनी नुसतीच नाटके पाहिली नाहीत ; तर
टांझानियातल्या एका छोटया गावात शेक्सपियर व ब्रेश्ट यांचे एकेक नाटक आणि
त्यांनीच पूर्वी केलेल्या 'खून पाहावा करुन' या नाटकाच्या गुजराती
रुपांतराचाही प्रयोग केला...!कॅनडा , अमेरिका आणि इंग्लंड येथे लागूंनी मोठमोठ्या अभिनेत्यांची नाटके पाहिली...न्यूयॉर्कला टेनेसी विल्यम्सच्या 'स्वीट बर्ड ऑफ यूथ'मध्ये जेराल्डीन पेज , लंडनमध्ये जॉन गीलगुडचा 'ओथेल्लो', युनेस्कोच्या 'र्हायनोसेरॉस'मध्ये लॉरेन्स ऑलिव्हिए आणि टेरेन्स रॅटिगनच्या 'रॉस'मध्ये अलेक गिनेस- या सर्वांचे सूक्ष्म समीक्षण 'लमाण'मध्ये आढळते...परंतु याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो पाश्चात्त्य रंगभूमी आणि मराठी रंगभूमी या दोहोंच्या व्यावसायिक शिस्तीमध्ये लागूंना जाणवलेला विरोध... पुढे पाश्चात्त्य रंगभूमीवर झालेल्या 'म्युझिकल्स'च्या झगमगटाचीही लागूंना प्रचिती आली आणि ती त्यांना बेगडी वाटणे हे रास्तच होते...गीलगुड-ऑलिव्हिए यांच्यानंतर पाश्चात्त्य रंगमंचावर एक-दोन पिढ्या आलेल्या आहेत , नाटककार व दिग्दर्शकांच्याही...तरीही 'लमाण'मध्ये नावाजलेले कलावंत इतिहासजमा झाले आहेत , असे म्हणता येणार नाही...
मुंबई-पुण्याला स्थायिक झाल्यावर गेली कित्येक वर्षे श्रीराम लागू नाटकात काम करीत आहेत...मधला एक मोठा काळ असा होता की , नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रांत ते व्यस्त होते...'लमाण'मध्ये 'सामना' किंवा 'झाकोळ'सारख्या एखाददुसऱ्या चित्रपटाचा अपवाद वगळता त्यांच्या चित्रपटीय कारकीर्दीबद्दल फारसे काही नाही...ही फारशी आश्चर्याची गोष्ट नाही , कारण त्यांचे रंगभूमीवरील कर्तुत्व आणि बहुतेक चित्रपटांतील त्यांची कामगिरी यांची तुलनाच होऊ शकत नाही...!
(क्रमशः)
धन्यवाद...!
♚ⓒⓢⓝ♚
अप्रतिम लेख 👌
ReplyDeleteछानच
ReplyDelete