Tuesday, November 17, 2020

Nazare Kadepathar photos

Nazare dam / malharsagar reservoirShivlingNagtirth

Karha ghat

Karha River


Nageshwar Temple & Ganapati Temple

Nageshwar Temple, Nazare dam, Ganapati Temple, Karha River 
At/Post : Nazare Kadepathar
Tal : purandar ; Dist : Pune 

 

Friday, September 11, 2020

✳️ नाझरे कडेपठार ✳️


              कऱ्हा नदीच्या काठावर नाझरे कडेपठार हे गाव वसले आहे...🏞️ पावसाळ्यामध्ये निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पहावयाचे असल्यास या गावाचा आपण नक्कीच विचार करु शकतो...म्हणूनच की काय 👉 चित्रपट, मालिका,वेब सिरीज यांचे चित्रीकरण करण्यासाठी नेहमीच या परिसराला पसंती दिली जाते... 📽️🎬

             एका बाजूला श्रीक्षेत्र भुलेश्वर म्हणजेच महादेवाचं पुरातन मंदिर तर दुसऱ्या बाजूला श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा आणि तिसऱ्या बाजूला श्रीक्षेत्र मोरगाव म्हणजेच अष्टविनायकांपैकी एक मयुरेश्वर...या तीन तिर्थक्षेत्रांनी वेढलेला निसर्गरम्य परिसर म्हणजे नाझरे कडेपठार...

             निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात निळे शुभ्र आकाश, ⛅ सर्वत्र पसरलेला हिरवागार गालिचा,🌱🌳 त्यावर सप्तरंगाची उधळण 💐 म्हणजे इंद्रधनुष्याचा एक विलक्षण सोहळाच...🌈 सायंकाळी डोळ्यांना सुखावणारी केशरी प्रकाशाची भुरळ... क्षितिजापाशी होणारी रंगांची उधळण...🌇 पशू-पक्षांचे सैरभैर फिरणे, त्यांचाही आनंद काही औरच असतो...🦜🕊️ बहुधा त्यांनाही निसर्गाचं बहरणं प्रिय असतंच ना...

            या गावात एक भव्यदिव्य तसेच जागृत पांडवकालीन नागेश्वराचं मंदिर आहे...गावातील गावकऱ्यांचं हे श्रद्धास्थान, ग्रामदैवत... 🛐 नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी होणारा भक्तीचा अभूतपूर्व जागर, वर्षातून फक्त त्याच दिवशी उघडणारं गुप्तलिंग...हे गुप्त लिंग मंदिराच्या शिखरावर वसलेले आहे...(याच दिवशी खंडोबा मंदिराच्या शिखरावरील गुप्तलिंग देखील उघडलं जातं )... श्रीशंकराचा हा सोहळा "याचि देही ; याचि डोळा" पाहून भान हरपून जाते...🤩 आणि नकळत मंदिरातील तो भाळी अर्ध चंद्र धारण करणारा 👉 चंद्रशेखर माझ्याशी संवाद साधतो आहे, अशी अनुभूती तिथे अनुभवायला मिळते...🗣️🌛

               मंदिराच्या शेजारी नदीपात्रात कोसळणारा नयनरम्य धबधबा तिथे येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकून घेत असतो...🌊 नदीकिनारी असलेला घाट मंदिराच्या वैभवात आणखीनच भर घालतो... त्याचप्रमाणे गावापासून पुढे गेल्यानंतर नाझरे धरण (मल्हार सागर) लागते...🌅 धरणाचा पाणीसाठा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो...जेजूरीमधील खंडोबा भक्तांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ, विरुंगळ्याचं ठिकाण... तरुणांसाठी तर तो एक सेल्फी पाॅईंटच म्हणावा लागेल...🤳 ते धरण म्हणजे पुरंदरच्या पूर्व भागातील, तसेच बारामतीच्या पश्चिम भागातील गावांसाठी कऱ्हा नदीच्या रुपाने एक जीवनवाहिनीच बनून राहिली आहे... नाझरे धरणाची साठवण क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट एवढी आहे...या धरणातून प्रवाहित होणारी कऱ्हा नदी ही निरा नदीची उपनदी आहे... पुरंदर तालुका तसेच बारामती तालुक्यातून मुक्त संचार करुन अंतिमतः ती निरा नदीला जाऊन मिळते...

               हिरव्यागार दाट वृक्षांची वर्दळ तर दुसरीकडे नाझरे धरण आणि मनमोहक नागेश्वर मंदिराचा परिसर अशा तिहेरी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावाचं वातावरण नक्कीच अतिशय रमणीय असंच आहे...

              माझ्या नजरेतून टिपलेलं गावाचं विहंगम दृश्य नक्कीच आपल्या मनाला स्पर्शून जाईल...! 🙂🤟🏻

धन्यवाद...! 🥰🙏


ⓒ चंद्रशेखर नाझीरकर. ✍️

Thursday, January 2, 2020

💌 उचकी 💌


उचकीलाच माहीत असतं 
आठवण कोण काढतं...🗣

आपल्या मात्र मनावरील
दडपणंच वाढतं...🙇

ज्यावर आपला जीव आहे
मन त्याच्याकडेच ओढतं...🦸

त्याच्या जवळ गेल्यावर
आपल्याला एकटं सोडतं...👩

उचकीमुळेच आयुष्यात 
हे सर्वकाही घडतं...💝💭

उचकीलाच माहीत असतं
नेमकं , आठवण कोण काढतं... 💞

©️ चंद्रशेखर नाझीरकर. 🙏

Friday, December 20, 2019

एका अवलिया "लमाणाचा" रंगभूमीला शेवटचा निरोप...! 🛌

                                                                                                                          (भाग- ३)👇
                                       'लमाण' मध्ये लागूंनी जवळजवळ सर्व नाटकांच्या अत्यंत मौलिक आणि उद्बोधक अशा हकीकती सांगितल्या आहेत...त्यातील काही थोड्यांचाच उल्लेख येथे करणे सोयीचे आहे...यात विजय तेंडुलकरांबरोबरच मोहन राकेश , गिरीश कर्नाड , सूगो बेट्टी यांच्यासारख्या दिग्गजांच्या अनुवादित नाटकांचा समावेश तर आहेच , पण अनेक नव्या दमाच्या नाटककारांचाही...यात वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'ने डॉक्टरांचे नाव अजरामर केले तर गो. पु. देशपांड्यांच्या 'उध्वस्त धर्मशाळा'ने त्यांच्या रंगमंचावरील कार्याला संपूर्ण नवे वळण दिले...
                        वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे...त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या...गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर , प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या. मोहन तोंडवळकर , सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही ते निष्ठेने वावरले...या सगळ्यांमध्ये उठून दिसतो तो थिएटर युनिटचा सत्यदेव दुबे...त्यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली...
                      महाराष्ट्र शासनाची रंगमंचीय सेन्सॉरशिपची यंत्रणा आणि 'गिधाडे' यांच्यामधील झगड्याची 'लमाण'मधली हकीकत अपेक्षेप्रमाणे रोमहर्षक आहे...(यात 'गिधाडे'चे इंग्रजी भाषांतर पुढे अलेक पदमसींनी रंगमंचावर आणले तेव्हा सेन्सॉरने त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही!) 'गिधाडे'बद्दल लागूंनी एखाद्या अव्वल दर्जाच्या समीक्षकासारखे लिहिलेले आहे...आपला संबंध आलेल्या बहुतेक सर्व नाटकांबद्दल लागू जाणकारीने लिहितात...यात 'उद्धवस्त धर्मशाळा'प्रमाणेच त्यांनी स्वत: अनुवादित करुन प्रायोगिलेल्या ज्या आनुईच्या 'ऑन्टिगनी'चाही उल्लेख करायला पाहिजे...'सामना' हा रामदास फुटाणे निर्मित व जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट ज्या दिवशी बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवासाठी गेला , त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली...आणीबाणीवर लागूंनी केलेली टीकाटिप्पणी त्यांची राजकारणाची समज किती प्रगाढ आहे , हे स्पष्ट करते...'उध्वस्त धर्मशाळा'ने हे सिद्ध केलेच होते...पुढे 'ऑन्टिगनी', गो. पुं.चे 'चाणक्य' यांच्या निवडीतही हेच स्पष्ट केले...
                   याच समजाप्रमाणे डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी किती पक्की आहे , हे 'सामाजिक कृतज्ञता निधी'साठी त्यांनी आचार्य अत्र्यांचे 'लग्नाची बेडी' हे नाटक घेऊन महाराष्ट्रभर जो अपूर्व असा दौरा केला , त्यावरुन दिसून येते...

'लमाण' हे त्या लेखकाइतकेच श्रेष्ठ आणि अद्वितीय आहे...!