Friday, August 30, 2019

खोटयाची दुनिया...

                                      खरे बोलले तर पाप आहे,
                                      खोटे बोलले तर माफ आहे...
                                      कानाडोळा करतो आपण सदा,
                                      हा हेतू येथे साफ आहे...

खोटेपणा,फसवणूक, भ्रष्टाचार हे शब्द काही आपल्याला नवीन नाहीत...खरेपणा बोटांवर मोजण्याइतका राहिलेला आहे...आता तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे...आजच्या युगात तंत्रज्ञान पुढे गेले आहे...पण माणूस मात्र मागे राहिलेला आहे...या प्रगती-अधोगतीत फार मोठा फरक आपल्याला पहायला मिळतो...माणूसच माणसाला अक्षरशा लुबाडत असतो,हे सत्य नाकारता येत नाही..."एकमेकां सहाय्य करुं,अवघे धरु सुपंथ" हे प्रबोधन आता मागे पडत आहे...याची मर्यादा फक्त →'ते ऐकायला चांगले वाटते' एवढीच राहिलेली आहे...याबाबत तुमचं काय मत आहे...ते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल...  ✍
धन्यवाद...!

फोटो साभार - @satyagrahNews
              
         ♚ⓒⓢⓝ♚

Thursday, August 22, 2019

ब्लॉगविश्व

संस्कारांच्या पेल्यातून, 
विचार मी सांडले... 
शब्दांतून माझ्या मी, 
अवघे ब्लॉगविश्व मांडले... ✍
  
      ♚ⓒⓢⓝ♚

Wednesday, August 21, 2019

ब्लॉगविषयी थोडेसे...

  

नमस्कार

 ,

  तुमच्या अपेक्षेप्रमाणे या ब्लॉगमध्ये 'काहीतरी नवीन' असणारच !... नाविन्याची सुरुवात वेबसाईटचे नाव आणि ब्लॉगचे नाव यापासूनच होते...वेबसाईटला मी "रंग- वर्षा" हे नाव दिले आहे...त्याचबरोबर, ब्लॉगचे "चंद्र मुखी " असे नामकरण केले आहे...याचा अर्थ असा होतो की, आमचे वडील डॉ.श्रीरंग नाझीरकर आणि आमच्या मातोश्री सौ.वर्षा नाझीरकर यांच्या शुभाशीर्वादाने प्रेरित होऊन मिळालेल्या संस्कारांचा खजिना घेऊन चंद्रशेखर नाझीरकर तुमच्यासमोर आपले विचार मांडणार आहे...मी व्यक्त होतोय तसेच तुम्हीही व्यक्त व्हा...! हाच माझा आग्रह असेल... ツ

धन्यवाद...!
                  
                                                                  ♚ⓒⓢⓝ♚