(भाग - १)
एक माणूस खूप श्रीमंत असतो...एके दिवशी त्याच्या ड्रायव्हरचा वाढदिवस
असतो... तेव्हा ड्रायव्हरला खूष करण्यासाठी त्याला एखादी भेटवस्तू द्यावी असा विचार मालकाने केला... लागलीच वाढदिवसाच्या निमित्ताने तो मालक आपल्या ड्रायव्हरला घेऊन एका कपड्यांच्या दुकानात जातो...
दुकानाजवळ गेल्यावर ' मी ५ मिनिटांत परत येतो ' असं म्हणून मालक
ड्रायव्हरला बाहेरच थांबण्याची सूचना करतो... आतमध्ये गेल्यावर तेथील
दुकानदाराला विविध शर्ट दाखवण्यास सांगतो... त्याप्रमाणे तो दुकानदार विविध
किंमतीचे शर्ट त्या मालकाला दाखवितो...
पहिल्यांदा तो दुकानदार १५०० रु. चा शर्ट दाखवितो...पण तो मालक म्हणतो की ,
' यापेक्षा अजून कमी (स्वस्त) किंमतीचा शर्ट दाखवा '... दुकानदार १००० रु.
चा शर्ट दाखवितो... पुन्हा तो मालक म्हणतो की, ' अजून कमी किंमत '...
दुकानदार पुन्हा ५०० रु.चा शर्ट दाखवितो...मालकाचं पुन्हा तेच वाक्य 'अरे
बाबा , स्वस्तातल्या स्वस्तात दाखव एखादा '... दुकानदार शेवटी २५० रु. चा
शर्ट दाखवितो... मालक तोच शर्ट निवडतो आणि पैसे देऊन तेथून निघायला
लागतो... तेवढ्यात दुकानदाराला न राहवून त्याने त्या मालकाला एक प्रश्न
विचारतो की, ' साहेब तुम्ही तर एवढे स्वस्त कपडे घालत नाही '...मग हा शर्ट
कोणासाठी ?... त्यावर तो मालक उत्तर देतो ...हा शर्ट माझ्यासाठी नाही रे ,
आज माझ्या ड्रायव्हरचा वाढदिवस आहे ना त्यामुळे घेतला...एवढं बोलून मालक
तेथून निघतो आणि बाहेर उभा राहिलेल्या आपल्या ड्रायव्हरला तो शर्ट भेट
म्हणून देतो...
(उर्वरित कथा दुसऱ्या भागात...)
धन्यवाद...!
♚ⓒⓢⓝ♚
No comments:
Post a Comment