कऱ्हा नदीच्या काठावर नाझरे कडेपठार हे गाव वसले आहे...🏞️ पावसाळ्यामध्ये निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पहावयाचे असल्यास या गावाचा आपण नक्कीच विचार करु शकतो...म्हणूनच की काय 👉 चित्रपट, मालिका,वेब सिरीज यांचे चित्रीकरण करण्यासाठी नेहमीच या परिसराला पसंती दिली जाते... 📽️🎬
एका बाजूला श्रीक्षेत्र भुलेश्वर म्हणजेच महादेवाचं पुरातन मंदिर तर दुसऱ्या बाजूला श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा आणि तिसऱ्या बाजूला श्रीक्षेत्र मोरगाव म्हणजेच अष्टविनायकांपैकी एक मयुरेश्वर...या तीन तिर्थक्षेत्रांनी वेढलेला निसर्गरम्य परिसर म्हणजे नाझरे कडेपठार...
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात निळे शुभ्र आकाश, ⛅ सर्वत्र पसरलेला हिरवागार गालिचा,🌱🌳 त्यावर सप्तरंगाची उधळण 💐 म्हणजे इंद्रधनुष्याचा एक विलक्षण सोहळाच...🌈 सायंकाळी डोळ्यांना सुखावणारी केशरी प्रकाशाची भुरळ... क्षितिजापाशी होणारी रंगांची उधळण...🌇 पशू-पक्षांचे सैरभैर फिरणे, त्यांचाही आनंद काही औरच असतो...🦜🕊️ बहुधा त्यांनाही निसर्गाचं बहरणं प्रिय असतंच ना...
या गावात एक भव्यदिव्य तसेच जागृत पांडवकालीन नागेश्वराचं मंदिर आहे...गावातील गावकऱ्यांचं हे श्रद्धास्थान, ग्रामदैवत... 🛐 नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी होणारा भक्तीचा अभूतपूर्व जागर, वर्षातून फक्त त्याच दिवशी उघडणारं गुप्तलिंग...हे गुप्त लिंग मंदिराच्या शिखरावर वसलेले आहे...(याच दिवशी खंडोबा मंदिराच्या शिखरावरील गुप्तलिंग देखील उघडलं जातं )... श्रीशंकराचा हा सोहळा "याचि देही ; याचि डोळा" पाहून भान हरपून जाते...🤩 आणि नकळत मंदिरातील तो भाळी अर्ध चंद्र धारण करणारा 👉 चंद्रशेखर माझ्याशी संवाद साधतो आहे, अशी अनुभूती तिथे अनुभवायला मिळते...🗣️🌛
मंदिराच्या शेजारी नदीपात्रात कोसळणारा नयनरम्य धबधबा तिथे येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकून घेत असतो...🌊 नदीकिनारी असलेला घाट मंदिराच्या वैभवात आणखीनच भर घालतो... त्याचप्रमाणे गावापासून पुढे गेल्यानंतर नाझरे धरण (मल्हार सागर) लागते...🌅 धरणाचा पाणीसाठा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो...जेजूरीमधील खंडोबा भक्तांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ, विरुंगळ्याचं ठिकाण... तरुणांसाठी तर तो एक सेल्फी पाॅईंटच म्हणावा लागेल...🤳 ते धरण म्हणजे पुरंदरच्या पूर्व भागातील, तसेच बारामतीच्या पश्चिम भागातील गावांसाठी कऱ्हा नदीच्या रुपाने एक जीवनवाहिनीच बनून राहिली आहे... नाझरे धरणाची साठवण क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट एवढी आहे...या धरणातून प्रवाहित होणारी कऱ्हा नदी ही निरा नदीची उपनदी आहे... पुरंदर तालुका तसेच बारामती तालुक्यातून मुक्त संचार करुन अंतिमतः ती निरा नदीला जाऊन मिळते...
हिरव्यागार दाट वृक्षांची वर्दळ तर दुसरीकडे नाझरे धरण आणि मनमोहक नागेश्वर मंदिराचा परिसर अशा तिहेरी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावाचं वातावरण नक्कीच अतिशय रमणीय असंच आहे...
माझ्या नजरेतून टिपलेलं गावाचं विहंगम दृश्य नक्कीच आपल्या मनाला स्पर्शून जाईल...! 🙂🤟🏻
धन्यवाद...! 🥰🙏
ⓒ चंद्रशेखर नाझीरकर. ✍️