|
उचकीलाच माहीत असतं
आठवण कोण काढतं...
️
आपल्या मात्र मनावरील
दडपणंच वाढतं...
ज्यावर आपला जीव आहे
मन त्याच्याकडेच ओढतं...🦸
त्याच्या जवळ गेल्यावर
आपल्याला एकटं सोडतं...
उचकीमुळेच आयुष्यात
हे सर्वकाही घडतं...

उचकीलाच माहीत असतं
नेमकं , आठवण कोण काढतं... 
©️ चंद्रशेखर नाझीरकर. 