Wednesday, September 18, 2019

दगडासाठी तू ,कसा झाला रे "दगड"...

उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात...पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही...जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात...पण तो जिवंत असेल तर त्याला जागीच ठार मारतात...जर आई-वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची "मनोभावे" पूजा करतो...पण ते जिवंत असतील तर त्यांची 'किंमत' समजत नाही !...फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे ? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे...तर आपण जिवंत माणसांना मदत करणे हेच पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल...यावर एकदा विचार करुन बघाच !... ツ


फोटो साभार -  गुगल
धन्यवाद...!     
                       
                                                                         ♚ⓒⓢⓝ♚

Tuesday, September 3, 2019

सद्य:स्थिती - "प्रत्येक घरातली ; घरातल्या प्रत्येकाची ..."

                                                     
                                                                 
                                                                   आई म्हणते 'ल्योक' झाला, 
                                                                    भाऊ म्हणतो "वैरी' झाला...



                हे कलयुगात आपणाला सर्रास पहायला मिळतं... लहानपणी सर्वांच्याच घरी सुख नांदत असतं, सर्वजण प्रेमाने 'एकत्र' राहत असतात...पण कालांतराने एकाच कुटूंबात वेगवेगळे विचार पेरले जातात...यामुळेच "वेगळं" राहण्याचा निर्णय घेतला जातो...आता होतं असं की, एक मुलगा शहरात नोकरी करत असतो आणि एक मुलगा गावात शेती करत असतो...जो मुलगा गावात असतो त्याला आई-वडील शेतीकामात मदत करतातच...करणारच ना ! बसून तरी काय करणार...पण जेव्हा आई-वडीलांचे हातपाय चालेनासे होतात...तेव्हा मात्र गावातल्या मुलाला आई-वडीलांचं 'ओझं' होतं...मग तो म्हणायला लागतो → आई-वडील फक्त माझेच आहेत का ?... दुस-या भावानेही थोडं सांभाळलं पाहिजे...तेव्हा शहरातल्या मुलाला वाटतं की आई-वडीलांनी 'माझ्यासाठी' काय केलं ,सर्व कामं तर त्याचीच केली...दुसरी गोष्ट अशी की, आई-वडीलांना शहरी वातावरण मानवणार नाही याचा विचारच झालेला नसतो...तरीही त्या आई-वडीलांना शहरात आणलंच तर ते एका जागी बसून किती दिवस राहू शकतील... त्यांना तर कामाची,फिरण्याची सवय असते...शहरी संस्कृतीमध्ये मुख्य दरवाजा पुर्णपणे बंदच असतो...त्यामुळे बोलायलाही कोणी नसतं...अशा परिस्थितीत आई-वडीलांच्या मनात 'तुरुंगात' टाकल्याची भावना डोकावत असते...लागलीच ते शहरातल्या मुलाकडे मागणी करतात...आम्हांला गावाकडे सोड,आम्हांला इथे कोंडल्यासारखं वाटतंय,आम्हांला मोकळ्या वातावरणाची सवय आहे...पण येथे एक मुद्दा उपस्थित होतो →गावाकडे आई-वडीलांना सांभाळणार कोण ?...दुस-या भावाची तर सांभाळण्याची "बारी" संपलेली असते...दोन मुलं असताना देखील आई-वडीलांची ही फरफट चालू आहे...यामुळेच आज वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे...याला कारणीभूत कोण असेल → जन्म देणारे आई-वडील की त्यांची मुलं हा एक चर्चेचाच  (ज्वलंत) विषय असेल...या विषयावर तुम्हीही व्यक्त होऊ शकता...

धन्यवाद...! 
फोटो साभार - @AaiVadil - fb page 

               
                                                                          ♚ⓒⓢⓝ♚